दाभाडीतील बँकेवर शिवसेनेचे हल्लाबोल आदोलन

34

सामना प्रतिनिधी । बदनापूर

शिवसेनेच्या वतीने बदनापूर विधानसभा मतदार संघातील दाभाडी येथे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या नेतृत्वात शेतकरी कर्ज माफीची यादी बँकेवर तसेच ग्रामपंचायतवर लावणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देणे यासाठी दाभाडीच्या बँकांवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

ग्रामीण बँक, दाभाडी येथे माजी आमदार संतोष सांबरे यांच्या समवेत विशाल पडोळ,कारभारी म्हसलेकर, राजेंद्र मेथे, बाबासाहेब जुंबड, मिलिंद साळवे, रवी मराठे, गजानन बकाल, मधुकर पाडुल, योगेश जैवळ, दीपक भेरे, गंगाप्पा जैवळ, माणिक बकाल, योगेश अंभोरे, विष्णू अंभोरे, सोनाजी अंभोरे, दामू बकाल, सवलहरी गाडेकर, विष्णू मोहिते, रामेश्वर फंड, दीपक टेकाळे, दीपक भुजंग, भाऊसाहेब गाडेकर व शिवसेनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार संतोष सांबरे यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून बँक मॅनेजरला धारेवर धरून जाब विचारला तसेच शेतकऱ्यांना चांगली वागणूक देऊन त्यांचे कर्जाबाबत समस्या त्वरित सोडविणे संदर्भात सूचना दिल्या. कारभारी म्हसलेकर यांनी बँक अधिकाऱ्यांना शेतकरी तसेच मुद्रा व अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वितरण बाबत खडेबोल सुनावले. विशाल पडोळ यांनी बँकेच्या कारभाराचे वाभाडे काढत शेतकरी व होतकरू तरुणांना लगेच कर्ज उपलब्ध करण्यासाठी सूचना केल्या. आठवडी बाजारास सुद्धा माजी आमदार संतोष सांबरे
यांनी भेट देऊन शेतकरी तसेच व्यापाऱ्यांशी चर्चा केली. दाभाडी येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या