अग्नी-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 4000 KM मारक क्षमता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदस्थानने आपल्या अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्र क्षमतेत आणखी एक महत्त्वाची भर घातली आहे. मध्यम पल्ल्याच्या ‘अग्नि-4’ या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे पार पडली. चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून बुधवारी, 6 ऑगस्ट 2026 क्षेपणास्त्र यशस्वीरित्या डागण्यात आले. विशेष म्हणजे ठरवून दिलेल्या मार्गावर क्षेपणास्त्राने यशस्वी झेप घेत आपली सर्व लक्ष्य पूर्ण करत आपली विश्वासार्हता सिद्ध केली.

स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या (SFC) अधिपत्याखाली पार पडलेली ही चाचणी हिंदुस्थानची अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता अधिक बळकट करणारी ठरली आहे. सद्यस्थितीतील जगभरातील तणावपूर्ण राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची ताकद या चाचणीमुळे पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. अग्नि-4 हे सुमारे 4,000 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते. यात सॉलिड फ्यूल टेक्नोलॉजीचा वापर केला जात असल्याने क्षेपणास्त्र झटपट तयार करून डागणे शक्य होते.