
उत्तर नगर जिह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे रात्री उशिरा धरणातील पाणीसाठा 55 टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी सकाळी या धरणातील पाणीसाठा 5826 दलघफू (52.78 टक्के) झाला होता. तर, सायंकाळी 5897 दलघफू (54.42 टक्के) होता. रात्री उशिरा यात आणखी वाढ झाली. तीन दिवस जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची जोरदार आवक झाल्याने पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. काल सकाळपर्यंत संपलेल्या 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस ः भंडारदरा 99 मि.मी., घाटघर 150, पांजरे 123, रतनवाडी 130, वाकी 66 मि.मी.



























































