नगरमध्ये हॉट स्पॉट ठिकाणांची पुन्हा जमावबंदी वाढवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून  मुकूंदनगर (नगर शहर), आलमगीर (नगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तु विक्रीवरील निर्बंध 23 एप्रिल पर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

या क्षेत्रातील नागरिकांना दुध, भाजीपाला, फळे, किराणा, औषधे इत्यादी योग्य ते शुल्क आकारुन शासकीय यंत्रणेमार्फत पुरविण्यात येणार आहेत. सुरुवातीला 14 एप्रिल पर्यंत या परिसरात निर्बंध जारी करण्यात आले होते. मात्र आता त्याची मुदत वाढवण्यात आली असून, 23 एप्रिलपर्यंत हे निर्बंध कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.