ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल आयसीयूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली असून प्रकृती बिघडली आहे. अहमद पटेल यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गुरगावमधील मेदांता रुग्णालयात अहमद पटेल यांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून आयसीयूत ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांचा मुलगा फैसल पटेल यांनी दिली आहे. 71 वर्षीय अहमद पटेल यांनी 1 ऑक्टोबर रोजी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रपृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ते लवकर बरे व्हावेत यासाठी आपण प्रार्थना करावी अशी आमची विनंती आहे असेही फैसल यांनी म्हटले आहे. अहमद पटेल यांच्यासाठी अनेक काँग्रेस नेत्यांनी ट्विट केले असून लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे