नगर जिल्ह्याचे शतक, कोरोनाचे 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

650

नगर जिल्ह्यात आज नव्याने चार कोरोना बधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 103 झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णात घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी तर नेवासा आणि श्रीगोंदा येथी प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या चौघांचे रिपोर्ट हे पॉझिटिव आले आहे.

दरम्यान आज जिल्ह्यातील 4 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. पाथर्डी आणि संगमनेर येथील प्रत्येकी 1 तर सारसनगर येथील 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 58 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. तर 55 जणांचे अहवाल येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता १०३ झाली आहे. त्यामध्ये नगर महानगरपालिका क्षेत्र 18, नगर जिल्हा 50, इतर राज्य 2, इतर देश 8, इतर जिल्हा 25 रूग्ण यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील मृत्यू दर 8.73 टक्के आहे.

आपली प्रतिक्रिया द्या