नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व, सात विद्यमान आमदारांचा पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे मताधिक्य मिळवले आहे. नगर जिल्ह्यातील अनेक दिग्गज आमदारांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 7 (पुरस्कुत धरुन), भाजपाला 3, तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. सर्वाधिक मताधिक्य मिळवून शिर्डी येथून राधाकृष्ण विखे हे 87 हजार मतांनी विजयी झाले. सर्वाधिक कमी मतांनी कोपरगावचे राष्ट्रवादीचे आशुतोष काळे विजयी झाले. काळे हे अवघ्या 829 मतांनी विजयी झाले आहेत.

कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांचा विजय, राम शिंदेंचा पराभव

नगर जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी 30 हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आहे. जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले मात्र दुसरीकडे काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. नगर जिल्ह्यामध्ये यंदा भाजपला मोठा फटका जिल्ह्यामध्ये बसला आहे. पराभूत झालेल्यांमध्ये वैभव पिचड, शिवाजीराव कर्डिले, विजय औटी, बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश आहे.

#ElectionResults2019 – विजयी उमेदवारांची नावे वाचा एका क्लिकवर

विधानसभेच्या 12 मतदारसंघांमध्ये आज मतमोजणी झाली. नगर मतदारसंघामध्ये शिवसेना महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संग्राम जगताप यांच्यामध्ये लढत झाली, जगताप यांचा 10,940 मतांनी विजय झाला आहे. तर सलग दुसर्‍यांदा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत.