कर्जत तालुक्यात जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत तालुक्यातील कुळधरण, बहिरोबावाडी यांसह विविध भागांमध्ये आज रविवारी दुपारी जोरदार पाऊस पडला. कुळधरण परिसरामध्ये पावसामुळे राशीन-कुळधरण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. यामुळे त्या परिसरातील वाहतूक बंद पडली होती.

कर्जत तालुक्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने खरीप पिके पाण्यात गेली आहेत. मका, तूर यांसह अनेक पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱयांनी चाळीत साठविलेल्या कांद्याचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर व खोकर परिसरात काल रात्री ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. वीजपुरवठा खंडित झाला. या पावसाने खोकर शिवारात उभे ऊस भुईसपाट झाले, तर अनेक ठिकाणी वीजवाहक तारांसह विजेचे पोल पडले, अनेक झाडे उन्मळून पडली.