
शहरातील केडगाव उपनगर परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सशस्त्र्ा दरोडेखोरांच्या टोळीने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी घरफोडीचे प्रयत्न झाले असून, नागरिकांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने या दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
केडगाव ते नेप्तीकडे जाणाऱया रोडवरील श्रीकृष्णनगर, मराठानगर, आदर्श कॉलनी या भागांमध्ये गेल्या पाच-सहा दिवसांपासून दररोज रात्री दरोडेखोरांची टोळी हातात घातक शस्त्र्ाs घेऊन येत आहे. रविवारी (दि.29) पहाटे पावणेदोनच्या सुमारास श्रीकृष्णनगर भागात ही टोळी एका बंद घराचे कुलूप तोडत असताना परिसरातील नागरिक जागे झाले. नागरिकांना येताना पाहून या दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. मात्र, जाताना नागरिकांवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत काही नागरिकांच्या घराबाहेर पार्क केलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या दरोडेखोरांनी त्यांच्याकडील दोन्ही दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. परिसरातील नागरिकांनी कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरोडेखोरांचा शोध घेतला. मात्र, अंधारामुळे चोरटय़ांचा मागमूस लागू शकला नाही. दरम्यान, केडगावातीलच मराठानगर व परिसरात दोन-तीन ठिकाणी घरफोडय़ा केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
अंधाराच्या साम्राज्यामुळे चोरटय़ांचे फावते
z केडगाव उपनगरातील बहुतांशी भागांतील पथदिवे सध्या नादुरुस्त होऊन बंद पडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्या भागात अंधाराचे साम्राज्य असते. याच अंधाराच्या साम्राज्यामुळे चोरटय़ांचे फावत आहे व ते नागरिकांवर दहशत निर्माण करत आहेत. महापालिकेने तातडीने या भागातील पथदिवे दुरुस्त करून सुरू करावेत, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे.































































