नगरमध्ये दोन कोरोनाबाधित सापडले

385

जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी जाण्यासाठी डिस्चार्ज दिल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच आज नगरमध्ये आणखी दोन कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यात एक फ्रान्सचा तर दुसरा आयव्हरी कोस्टचा नागरिक आहे. या दोघांशी संबंधित 09 व्यक्तींनाही घेतले ताब्यात. त्यांचे स्त्राव चाचणीसाठी पुण्याला पाठवले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे.

जिल्हात यापूर्वी तीन कोरोनाबाधित व्यक्ती सापडल्या होत्या. त्यापैकी पहिल्या बाधिताचे 14 दिवसानंतरचे दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यास आजच घरी जाण्यासाठी डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आज पुन्हा दोन परदेशी व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्याने जिल्यातील बाधितांची संख्या वाढली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी. घराबाहेर पडू नये व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

कोरोना संदर्भामध्ये उपायोजना करण्याकरिता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रवीण मुरंबीकर यांच्यासह महसूल , पोलिस, ,महानगरपालिका सह सर्वच यंत्रणा अहोरात्र झटत असल्याचे चित्र दिसून आहे. त्यामुळे नागरिकांनीही त्याची दखल घेत प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या