नगर- निराधार विधवा महिलांना किराणा साहित्याची मदत; पोलीस व सामाजिक संघटनेचा उपक्रम

कोरोना व्हायरसमुळे आज संपूर्ण जग चिंतेत आहे. सरकारने कठोर पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात ठेवून ती पूर्वपदावर आणण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. प्रशासनाकडून सर्व नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता घरात राहण्याबाबत आवाहन करण्यात आले असून त्यास नागरिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. मात्र यामुळे समाजातील निराधार विधवा महिला व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

नगर येथील विवेकानंद होलिस्टिक डेव्हलमेंट सेंट व नगर शहर पोलीस दलाने विधवा महिला व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये याची दखल घेऊन आज 100 निराधार विधवा महिलांना उपजीविकेसाठी गहू, तांदूळ, तेल, दाल व इतर किराणा, जीवनावश्यक वस्तू साहित्याचे वाटप केलेले आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा समाजात प्रसार होऊ नये या करता राज्यात संचरबंदी करण्यात आली आहे. विवेकानंद होलिस्टिक डेव्हलमेंट सेंटरचे पदाधिकारी सुनील हुरेने, श्रीकांत पाठक, शेखर देव, विराज आहुजा व पोलिस उपधोक्षक संदीप मिटके, नगर शहर पोलिस दलाचे सर्व निराधार विधवा महिलांनी आभार मानले असून या उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे.

यावेळी मिटके यांनी कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. त्याकरता सुरुवातीपासूनच सरकारने कठोर पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात ठेवून ती पूर्वपदावर आणण्यासाठी योग्य नियोजन केले आहे. मात्र आपल्याला या महामारीचा सामना करायचा असेल, तर सर्वांनी लॉकडाऊन व संचारबंदीत घरी थांबावे. नियमांचे पालन करावे. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. पोलिस दलास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या