नगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांना उमेदवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाकरता महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या राजश्री घुले तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे प्रताप शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा निर्णय मंगळवारच्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आला आहे.

याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे व राष्ट्रीय काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी एकत्रितपणे जाहीर केले आहे. या बैठकीला आमदार रोहित पवार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, आमदार अशितोष काळे, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार दादा कळमकर, लोक क्रांती दलाचे सुनील गडाख जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी अध्यक्ष मंजुषा गुंड, काँग्रेसचे सत्यजीत तांबे, करण ससाने इत्यादी सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.