अरे मियाँ! हा कोणता डान्स प्रकार आहे

2412

आजवर तुम्ही एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांना अनेक सभांमधून वादग्रस्त भाषण करताना ऐकलं असेल. मात्र तुम्ही त्यांना कधी डान्स करताना पाहिलं आहे का? सोशल मीडियावर सध्या ओवैसी यांचा डान्स करताना एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. संभाजीनगर येथील पैठण गेट येथे आयोजित सभेनंतर ओवैसी डान्स करताना दिसले आहेत. ‘मियाँ मियाँ भाई’ या गाण्यावर त्यांनी हा डान्स केला आहे.

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या ओवैसी यांचा प्रथमच अशा प्रकारचा डान्स करताना व्हिडीओ समोर आला आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजता सर्व पक्षाची प्रचाराची घोडदौड थांबणार आहे. तसेच सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी मतदानात तर 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या