
पार्किंगच्या वादातून हिंदुस्थानच्या एअरफोर्समधील स्क्वॉड्रन लीडरसह चार जणांना मारहाण झाल्याची घटना विलेपार्ले येथे घडली. मारहाणप्रकरणी सिद्धेश पवार, अमित माळी, शुभम परदेशी, दिव्यांग वाघिया, हिरेन वाघिया, अभिषेक परदेशी, तुषार धुरी, राजेश वायंगणकर, अनिकेत धुरी आणि अनिरुद्ध नायरला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. त्या दहा जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार हे एअरफोर्समध्ये स्क्वॉड़न लीडर म्हणून काम करतात. गेल्या आठवडय़ात तक्रारदार आणि त्याचे तीन मित्र हे उत्तर प्रदेशच्या जामनगर एअर स्टेशनहून गोरखपूरला विमानाने गेले. त्यानंतर ते रात्री विलेपार्ले येथील टी-1 विमानतळावर आले. जामनगरला जाण्यासाठी विमानाला उशीर असल्याने ते विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये गेले. तेथे त्या चौघे दारू प्यायले. विमानाला उशीर असल्याने ते चौघे टॅक्सीने विलेपार्ले येथील एका हॉटेलजवळ गेले. हॉटेलजवळ एक मोटारसायकल पार्क केल्याने त्यांची टॅक्सी आत जात नव्हती. तेव्हा तक्रारदाराने ती मोटारसायकल बाजूला काढायला सांगितले. त्यावरून त्याचा वाद झाला. वाद झाल्यावर आणखी तीन जण तेथे आले. त्याने तक्रारदार आणि त्याच्यासोबत असलेल्या तिघांना मारहाण केली. त्या चौघांनी प्रतिकार केला असता 10 जणांनी तक्रारदार यांना विटा आणि रॉडने मारहाण केली. त्यात तक्रारदार हे गंभीर जखमी झाले. हा प्रकार समजताच विलेपार्ले पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून त्या दहा जणांना अटक केली.































































