
Air India च्या बंगळुरुहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या पायलटची तब्बेत विमान उड्डाण घेण्यापूर्वीच खालावली. त्यामुळेच एकच गोंधळ उडाला होता. पायलटला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि लगेचच त्या पायलटच्या जागी दुसऱ्या पायलटची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सर्व प्रवशांना सुखरूप दिल्लीला पाठवण्यात आले.
एअर इंडियाने या संदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “4 जुलै रोजी सकाळी आमच्या एका पायलटची तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे तो बंगळुरूहून दिल्लीला जाणारे AI2414 हे विमान उडवण्यास असमर्थ होता. या परिस्थितीमध्ये आम्ही त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या पायलटची तब्बेत ठीक असून त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.” अशी माहिती एअर इंडियाने दिली आहे.