Air India Plane Crash – अपघातावर ‘एअर इंडिया’चं ट्विट, 11 वर्ष जुने बोइंग विमान 242 प्रवाशांसह कोसळलं

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळले असून अपघातानंतर आकाशात धुरांचे लोट उठल्याचे दिसले. याचे व्हिडीओही मीडियावर व्हायरल झाले आहेत. याबाबत आता ‘एअर इंडिया’नेही ट्विट करत अधिकृत माहिती दिली आहे.

‘एअर इंडिया’ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारी फ्लाइट एआय 171 आज 12 जून 2025 रोजी कोसळले. या दुर्घटनेमध्ये किती नुकसान झाले याची माहिती आम्ही घेत असून शक्य तितक्या लवकर याबाबत अधिक माहिती http://airindia.com आणि आमच्या एक्स हँडल https://x.com/airindia वर शेअर करू.

दरम्यान, बोईंग 787-8 ड्रिमलायनर हे विमान लंडनकडे जाताना कोसळले. हे विमान 11 वर्ष जुने होते. या विमानामध्ये 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते. अपघातानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

Air India Plane Crash – शेअर बाजारावरही परिणाम; टाटा समुहाचे शेअर कोसळले