
12 जून रोजी अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावलेला एकमेव प्रवासी विश्वास कुमार रमेश यांना बुधवारी रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर विश्वासकुमार हे त्यांच्या भावाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यावेळी भावाला अखेरचा निरोप देताना विश्वासकुमार यांना अश्रू अनावर झाले.
विश्वासकुमार आणि त्यांचा लहान भाऊ अजय रमेश हे दोघे एअर इंडियाच्या विमानाने लंडनला निघाले होते. उड्डाणाच्या अवघ्या तीस सेकंदात ते विमान कोसळले. या विमानातील 242 प्रवाशांपैकी 241 प्रवाशांचा मृत्यू झाला तर विश्वास कुमार हे त्या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावले गेले. त्यांचा लहान भाऊ अजय मात्र वाचू शकला नाही. या दुर्घटनेत विश्वास कुमार यांच्या चेहऱ्याला व हाताला लागले होते.
अजय रमेश यांच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. अहमदाबादवरून त्यांचा मृतदेह ते राहत असलेल्या दिव शहरात नेण्यात आला. दरम्यान विश्वासकुमार यांनाही बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर ते भावाच्या अंत्ययात्रेला पोहोचले. त्यांनी भावाच्या पार्थिव शरीराला खांदाही दिला. मात्र लहान भावाला अखेरचा निरोप देताना विश्वास कुमार यांना अश्रू अनावर झाले.