
एअर इंडियाने आखाती देशांकडे जाणारी सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. एअर इंडियाने आखाती देशात जाणारी सर्व उड्डाणे स्थगित करण्याची घोषणा करत प्रवासासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे आखाती देशात तणाव निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याने प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच एकमेकांविरोधात क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाने आखाती देशातील सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.
मध्य पूर्वेच्या काही भागात सध्या तणाव आहे. हल्ल्यांचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. इराणपासून इस्रायलपर्यंत आणि कतारपासून अबू धाबीपर्यंत तणावाचे वातावरण आहे. इस्रायल हल्ले करत आहे, त्याला इराण बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर देत आहे. या देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केले जात आहे. याचा परिणाम हवाई सेवांवर होत आहे. ही तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेता एअर इंडियाने आखाती देशातील सर्व उड्डाणे स्थगित केली आहेत. हा निर्णय खबरदारी म्हणून घेण्यात आला आहे.
In view of the developing situation in parts of the Middle East, all Air India flights to all destinations in the Middle East have been suspended. We remain committed to maintaining the highest standards of safety for our passengers and crew. We will continue to…
— Air India (@airindia) February 28, 2026
एअर इंडियाने आखाती देशात जाणारी सर्व उड्डाणे स्थगित केल्याबद्दल एक्सवर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, आम्ही आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा राखण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या उड्डाण ऑपरेशन्ससाठी सुरक्षा परिस्थितीचे सतत मूल्यांकन करू आणि आवश्यकतेनुसार ऑपरेशनल बदल करू. आमचे संघ प्रवाशांना सर्व शक्य मदत करतील. एअर इंडियाने म्हटले आहे की फ्लाइटची स्थिती आणि अपडेट्स https://airindia.com/in/en/manage/flight-status.html येथे तपासा. तसेच अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या २४x७ कॉल सेंटरशी +९१ ११६९३२९३३३ आणि +९१ ११६९३२९९९९ वर संपर्क साधा. आम्ही तुम्हाला आमच्या वेबसाइट http://airindia.com ला भेट देण्याची विनंती करतो. तुमच्या संयम आणि सहकार्याबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट करण्यात आली आहे.

























































