
ट्रायने नुकताच ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर केला असून यात व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल स्थानी असून डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. ट्रायने व्हॉइस आणि डेटा सेवा दोन्हीसाठी मोबाइल नेटवर्क कामगिरीचे मूल्यांकन केले आहे. या मूल्यमापनात कॉल सेटअप सक्सेस रेट, कॉल ड्रॉप रेट, मीन ओपिनियन स्कोअरद्वारे व्हॉइस क्लॅरिटी, डाऊनलिंक आणि अपलिंक पॅकेट ड्रॉप रेट, कॉल सायलेन्स इंस्टन्स व एकूण कव्हरेज यांचा समावेश होता. कॉल सेटअप सक्सेस रेट मेट्रिकमध्ये जिओ आणि व्होडाफोन दोघांनीही चांगली कामगिरी केली. व्होडाफोन आयडियाने मध्यम कामगिरी दाखवली, तर बीएसएनएल सर्व मूल्यांकन केलेल्या श्रेणींमध्ये मागे पडल्याचे दिसत आहे.

























































