
बदलत्या काळाबरोबरच देशात इंजिनिअरिंगची क्रेझ कमी झालेली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘एआयएसएचई’च्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांत बीई बीटेकच्या युजी अभ्यासक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीत घट झाली आहे. पदवी स्तरावर प्रवेश घेणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी एकूणच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशात घट झाली आहे.
या अहवालानुसार, नियमित बीटेक आणि बीईच्या प्रोग्राममधील नोंदणी 2016-17 मधील 40.85 लाखांवरून 2020-21 मध्ये 36.63 लाखांवर 10 टक्के कमी झाली आहे. हा आकडा 2019-20 आणि 2020-21 दरम्यान अभियांत्रिकी कार्यक्रमांसाठी नोंदणी करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत फक्त 20,000 ने किंचित वाढ आहे, तरीही ही वाढ गेल्या पाच वर्षांतील सर्वात कमी वाढ आहे.
पाच वर्षांपूर्वी इंजिनिअरिंग प्रचंड क्रेझ होती. त्यावेळी इंजीनिअरिंगमध्ये विद्यार्थ्यांची रुची होती. अन्य कोर्सेसच्या तुलनेत इंजिनीअरिंग तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी युजीमध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजेच बीए प्रोग्राम पहिल्या स्थानावर होता, त्यानंतर बीएससी दुसऱ्या स्थानावर आणि तिसऱ्या नंबरवर इंजिनीअरिंग. मागील पाच वर्षांतील अभियांत्रिक प्रवेशात घट पाहायला मिळत आहे. बीटेक आणि बीई प्रोग्राम तिसऱ्या क्रमांकावर तर बीकॉम चौथ्या स्थानावर आहे. बीकॉम 37.9 लाख विद्यार्थी आहेत जे बीई आणि बीटेक प्रोग्रामपेक्षा जास्त आहेत.
2020-21 मध्ये BA मधील नोंदणी पदवी स्तरावरील एकूण नोंदणीच्या 33.5 टक्के आहे. यानंतर BSC ला 15.5टक्के आणि वाणिज्य 13.9टक्के आहे. यानंतर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची पाळी येते. यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी टक्केवारी 11.9टक्के आहे. केवळ बीटेकच नाही तर एमटेक (मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) प्रोग्राममधील विद्यार्थ्यांची संख्या 2016-17 मधील 1.6 लाखांवरून 2020-21 मध्ये 1.38 लाखांवर आली आहे. त्याच वेळी, इतर प्रमुख पदवी कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीत वाढ झाली आहे. बीए, बीएससी आणि बीकॉम सारख्या कार्यक्रमांमध्ये गेल्या पाच वर्षांत नावनोंदणी झपाट्याने वाढली आहे. बीएमध्ये 2016-17 मध्ये 80 लाखांवरून 2020-21 मध्ये 85 लाखांपर्यंत वाढ झाली, तर बीएससीमध्ये 44 लाखांवरून 47 लाख आणि बीकॉममध्ये 2016 मध्ये 34 लाखांवरून 2020 मध्ये 37 लाखांपर्यंत वाढ झाली.
यामागील कारण स्पष्ट झालेले नाही, तरीही अनेक प्रकारच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमांमध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळविण्यासाठी विद्यार्थी बीटेक किंवा बीईमध्ये प्रवेश घेणे टाळतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. बीटेक आणि बीईच्या खडतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही प्लेसमेंट न मिळणे हे यामागचे दुसरे कारण असू शकते.


























































