ऐश्वर्याला मोटरस्पोर्टस्च्या वर्ल्ड कपमध्ये ऐतिहासिक जेतेपद

246

हिंदुस्थानच्या 23 वर्षीय ऐश्वर्या पिस्साय हिने मंगळावारी ऐतिहासिक कामगिरी केली. ‘एफआयएम’ वर्ल्ड कपच्या महिला विभागात अजिंक्यपद पटकावणारी ती पहिलीच हिंदुस्थानी महिला ड्रायव्हर ठरली. मोटर स्पोर्टस् विभागात प्रथमच हिंदुस्थानी महिलेने बाजी मारली, हे विशेष. ऐश्वर्याने कनिष्ठ गटातही दुसरे स्थान पटकावले आहे.

दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत ऐश्वर्याने बाजी मारली होती. त्यानंतर पोर्तुगाल (तिसरे), स्पेन (पाचवे) आणि हंगेरी (चौथे) येथे पार पडलेल्या स्पर्धेतही तिने लौकिकास साजेशी कामगिरी करताना 65 गुणांची कमाई केली होती. अवघ्या चार गुणांच्या फरकाने ऐश्वर्याने महिला गटाचे जेतेपद पटकावले.