अजय देवगण नंबर एक बॉलीवूड स्टार

बॉलीवूडमधला ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून ओळखला जात असलेल्या अभिनेता अजय देवगणची 100 वी कलाकृती असलेल्या ‘तान्हाजी’ चित्रपटाने कमाल केली आहे. 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवतच असताना स्कोअर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही अजय देवगण नंबर वन स्थानी विराजमान झालेला आहे. जानेवारी महिन्यात ‘तान्हाजी’ चित्रपटामुळे अजय देवगणच्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झालेली दिसून येतेय. ‘तान्हाजी’ चित्रपटाच्या प्रमोशनामुळे वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यात अजयने लोकप्रियतेत चौथे स्थान मिळवले होते. पण चित्रपट सिनेमागृहांमध्ये झळकताच अजय देवगणच्या लोकप्रियतेत वाढ झाली आणि अजय पहिल्या स्थानी पोहोचला. ‘तान्हाजी’च्या रिलीज वेळीच सुपरस्टार रजनीकांतचा ‘दरबार’ चित्रपटही झळकला. या सिनेमाच्या लोकप्रियतेमुळे रजनीकांतच्याही लोकप्रियतेत वाढ झालेली दिसून येतेय. साऊथ सुपरस्टार रजनीकांत आपल्या सिनेमाच्या रिलीज वेळी सातव्या स्थानावर होते तर चित्रपट रिलीज झाल्याकर ते सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानी पोहोचले.

आपली प्रतिक्रिया द्या