
हिंदुस्थानचा मधल्या फळीतील आघाडीचा खेळाडू अजिंक्य रहाणे याच्या मुलाच्या बारशाचा कार्यक्रम दिमाखात पार पडला.

अजिंक्यची पत्नी राधिका हिने मुलाच्या बारशाचे फोटो समाजमाध्यमावर शेअर केले आहेत.

मराठमोळ्या पद्धतीने हा बारशाचा कार्यक्रम पार पडला असून दोघांनी मुलाचे नाव ‘राघव’ असे ठेवले आहे.

प्रभू श्रीरामाला राघव असे म्हटले जाते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना हा मुलगा झाल्याने त्यांनी देवाचेच नाव ठेवल्याची चर्चा समाजमाध्यमावर रंगलीय.

अजिंक्य आणि राधिका या दांपत्याला आर्या नावाची एक मुलगीही असून ऑक्टोबर 2019मध्ये तिचा जन्म झाला होता.

राधिकाने शेअर केलेल्या बारशाच्या फोटोंमध्ये त्यांचे पूर्ण कुटुंब दिसत आहे. एका फोटोत अजिंक्य बाळाला कडेवर घेऊन येताना दिसतोय.




























































