इंडियन ऑइलच्या महाव्यवस्थापकपदी अजित धाकरस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन ऑइलच्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा आणि छत्तीसगड या पश्चिम विभागात येणाऱया पाच राज्यांच्या मुख्य महाव्यवस्थापकपदाचा पदभार अजित धाकरस यांनी गुरुवारी स्वीकारला. त्यांनी मुख्य कार्यालयासह देशातील विविध कार्यालयांत तीन दशके यशस्वीपणे काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांना कंपनीची कार्यपद्धती तसेच एचआर विभागाबरोबरच परदेशी कंपन्यांबरोबर काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. धाकरस यांच्याकडे आता आरोग्य, सुरक्षा, पुरवठा, वितरण, गुणनियंत्रण, देखभाल, एचआर, अव्हिएशन, कॉर्पोरेट संपर्क, किंमत, योजना, सिस्टम, आर्थिक याबरोबर विविध बाबी हाताळण्याची जबाबदारी असणार आहे. त्यांनी मुंबईतील व्हीजेटीआय संस्थेतून अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले आहे.