कश्मीरची स्थिती लवकरच सामान्य होणार; अजित डोवाल यांना विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कश्मीरमधील परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. सद्यस्थितीत कश्मीरी नागरिक एखाद्या ठिकाणी एकत्र आले, तर त्याचा फायदा दहशतवाद्यांना होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही पावले उचलण्यात आली आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोवाल यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव आणि खोऱ्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठीच काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र,कोणावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कश्मीरमधील परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, कोणावरही देशद्राहाचा गुन्हा दाखल झालेला नाही. कश्मीरमधीस स्थिती सामान्य होईपर्यंत आणि जनजीवन सुरळीत होईपर्यंत या नेत्यांना ताब्यात ठेवण्यात येणार असल्याचेही डोवाल यांनी स्पष्ट केले. कश्मीरमध्ये लवकरच लोकशाही स्थापन होईल आणि जनजीवन सुरळीत होईल, असा विश्वासही डोवाल यांनी व्यक्त केला. अपेक्षेपेक्षा लवकर कश्मीरमधील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. परिस्थिती झपाट्याने सुधारत आहे. आतापर्यंत एकच अनुचित घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. दगडफेकीच्या घटनेत 6 ऑगस्टला एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याला गोळी लागलेली नसून अवजड वस्तूचा फटका बसल्याचे त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सुरक्षा दल सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.