
अजित पवार यांच्या अपघातानंतर नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) काही विमानांच्या उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेते, युवासेना प्रमुखआदित्य ठाकरे म्हणाले की, डीजीसीएच्या उडान स्कीममध्ये जेवढे एअरपोर्ट झालेत त्यातील अनेक बंद पडले आहेत. मग ते कुणासाठी सुरू केले होते?, पैसा कशासाठी खर्च केला?, ते एअरपोर्ट कोण चालवतेय?, कोणाचे कंत्राट होते, अशी प्रश्नांची सरबत्ती आदित्य ठाकरे यांनी विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना केली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, नुकतेच अंदमानात एक हेलिकॉप्टर पडले, एक एअर ऍम्ब्युलन्स पडली. त्यात 7 जण गेले, पण त्यात ब्लॅक बॉक्सही नव्हता. स्पाईसजेटच्या विमानाला इमर्जन्सी डिक्लेर करून परत यावे लागले. काय चाललेय काय? हवेतून जायचे तर धोका. बोटीतून जायचे तर धोका. रस्त्यावरून जायचे तर कुणी खड्डय़ात पडून मरतेय. काल सरकारने ठराव केला नागरिकांसाठी काम करू. मग 12 वर्षे कुणासाठी काम करत होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.






























































