
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच बारामतीजवळ विमान अपघातात निधन झाले. या दुखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळत आहेत. मंगळवारी अजितदादांच्या अस्थी पंढरपुर येथे आणण्यात आल्या होत्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर रथामध्ये अस्थी कलश व अजितदादांचा फोटो ठेवून बाल वारकऱ्यांसह नेते मंडळी समवेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चौफळा ते नामदेव पायरी, तिथून चंद्र्भागा तिरावर कलश आणण्यात आला. त्यानंतर अजितदादांच्या अस्थिंची विधिवत पूजा करून अस्थी आमदार अभिजित पाटील, संदीप मांडवे, वसंतराव देशमुख यांनी होडीतून मध्यभागी नेत त्यांचे विसर्जन केले.






























































