
सामना ऑनलाईन । मुंबई
केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं ’56 इंचाच्या छातीवाल्यांसाठी 56 प्रश्न’ असं म्हणत ‘#जवाबदो’ हा उपक्रम जोरात सुरू केला आहे. सोशल मीडियावरून निर्णय जाहीर करणाऱ्या सरकारला सोशल मीडियावरच घेरायचं असं चक्रव्युह राष्ट्रवादीनं आखलं असून प्रश्न विचारताना थेट मंत्र्यांना ट्विटर अकाऊंटवर टॅग केलं जात आहे. त्यामुळे ट्विटर टॅग वॉर रंगणार असं चित्र आहे.
आज जलयुक्त शिवारातील प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना प्रश्न टॅग केला आहे. ‘जलयुक्त शिवार योजनेतील कामावर कॅगने अनियमिततेबद्दल ताशेरे ओढले. त्यावर काय कारवाई झाली? जलयुक्त शिवार योजनेतून किती सिंचनक्षेत्र निर्माण झाले?’, असे प्रश्न आज विचारण्यात आले आहेत. आता मंत्री म्हणून गिरीश महाजन त्यावर काही उत्तर देतात की, गप्प बसतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांनी अशास्त्रीय पद्धतीने काम केल्याचा आरोप जलतज्ज्ञांनी केला होता. कॅगने अनियमिततेबद्दल ताशेरे ओढले. त्यावर काय कारवाई झाली? जलयुक्त शिवार योजनेतून किती सिंचनक्षेत्र निर्माण झाले?
#जवाबदो@CMOMaharashtra @girishdmahajan pic.twitter.com/FKoDOQiLXw— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 3, 2018

























































