आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-deputy-cm

राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱयांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत, वेळप्रसंगी अधिक चर्चा करून आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. काही मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये देहू आणि आळंदी पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी. वारकरी सांप्रदायिक कोरोनाचे सर्व नियम पाळेल. सातशे वर्षांची परंपरा अखंडित राहावी, अशी मागणी वारकऱयांच्या वतीने करण्यात आली.