मी काय चुकीचे बोललो – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar-ncp

सामना प्रतिनिधी, कोल्हापूर

मी काय चुकीचे बोललो अशी सारवासारव करीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज पुन्हा तोंड सोडले आहे. ‘मुतऱ्या तोंडाचे अजित पवार’ यांची शनिवारी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून जोरदार चंपी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. नाक्यानाक्यांवर, राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये या अग्रलेखाचे जाहीर वाचन झाले. सोशल मीडियावर तर अग्रलेखाचे प्रचंड स्वागत झाले.

शिवसेनेवर नाहक टीका करणाऱ्या अजित पवारांची ‘सामना’कारांनी उतरविली, चांगलाच दणका दिला अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांनी फेसबुक, व्हॉटस्अॅपवर व्यक्त केल्या. कोल्हापूर दौऱ्यावर आज आलेल्या अजित पवार यांना पत्रकारांनी याबाबत टोकले असता मला काही बोलायचे नाही अशी सारवासारव त्यांनी केली, मात्र त्यानंतर पुन्हा तोंड सोडले आणि मी काही चुकीचे बोललेलो नाही असे म्हटले. शिवसेनेला कोल्हापुरी मिरच्या झोंबल्या, असेही ते म्हणाले.

summary- ajit pawar replies to saamana editorial