
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पहिले ट्वीट केले असून यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. अजित पवार यांनी 20 मिनिटात आभाराचे 20 ट्वीट केल्यात्यामुळे त्यांचे बंड कायम असल्याचे दिसून येत आहे.
https://www.saamana.com/maha-political-twist-shiv-sena-uddhav-thackeray-ncp-sharad-pawar-renaissance-hotel/
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून राज्यात स्थिर सरकारबाबत शब्द दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी राज्याला स्थिर सरकार देऊ, असे ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.
Thank you Hon. Prime Minister @narendramodi ji. We will ensure a stable Government that will work hard for the welfare of the people of Maharashtra. https://t.co/3tT2fQKgPi
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019
मोदींसह अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, निर्मला सितारमण, स्मृति इराणी, राजनाथ सिंह, पियूष गोयल, जगत प्रतापसिंह नड्डा, अनुराग ठाकूर, धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अन्य भाजप नेते, तसेच रिपाईचे रामदास आठवले यांचे आभार मानले आहेत. तसेच ट्विटर हँडलवर ‘उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र’ असे पदही जोडले आहे.



























































