
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची ‘महारेरा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहनिर्माण खात्याने आज यांसदर्भातील आदेश जारी केले. गौतम चॅटर्जी हे निवृत्त झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
अजोय मेहता हे 1984च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अजोय मेहता हे राज्याचे मुख्य सचिव होते. त्याआधी त्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्तपदही सांभाळले होते. काही दिवसांपूर्वीच अजोय मेहता प्रधान सचिव पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


























































