आकांक्षा कदमने सलग दुसऱ्यांदा राज्य कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा उदय कदम दुसऱ्यांदा राज्य कॅरम स्पर्धेची विजेती ठरली आहे. मागील तीन दिवस राज्यस्तरीय 13वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा शिवाजी पार्क, दादर जिमखाना येथे सुरू होती. सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणचा आकांक्षाने सलग दोन सेटमध्ये पराभव केला. आकांक्षा कदमने सलग दुसऱ्यांदा राज्य कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले

आंतरराष्ट्रीय कॅरमपटू असलेल्या आकांक्षाने याआधी देशाबाहेर प्रथमच खेळताना मालदीव मध्ये देशाला दोन सुवर्णपदक पहिल्यांदाच मिळवून दिली होती. आकांक्षाला अजून पर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके, तीन सिल्व्हर, एक अशी पदके मिळाली आहेत. राणी लक्ष्मीबाई शौर्य पुरस्काराने सुद्धा तिला सन्मानित करण्यात आले आहे. या विजेतेपदामुळे तिचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.