
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत केंद्र सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, मागील पत्रकार परिषदेत त्यांनी फॉर्म 7 बाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर सरकारने दिल्ली, लखनऊ आणि देशातील इतर ठिकाणांतील एजन्सी व व्यावसायिकांना कामाला लावले आहे. त्यांच्याकडे संपूर्ण मतदार यादी असून, त्याच्या आधारे समाजवादी पक्ष जिंकलेल्या मतदान केंद्रांची ओळख पटवली जात आहे. त्या ठिकाणी फॉर्म 7 भरून छापले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचाही दावा त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, भाजपने SIR प्रक्रियेच्या माध्यमातून बिहारमधील निवडणुका आधीच जिंकल्या आहेत. आता पश्चिम बंगालमध्येही त्याच पद्धतीचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
#WATCH | Lucknow, UP | SP Chief Akhilesh Yadav says, “At the last press conference, we raised questions about Form 7, and the government has engaged agencies and professionals based in Delhi, Lucknow, and other parts of the country. They have the complete voter list, and using… pic.twitter.com/LBCnV4snrm
— ANI (@ANI) February 8, 2026
पश्चिम बंगालमधील राज्य सरकार आणि मुख्यमंत्री वारंवार निवडणूक आयोग भाजपचा आयोग बनल्याचा आरोप करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले. “निवडणूक आयोगाने आता थेट भाजपचा झेंडा फडकवावा,” अशी उपरोधिक टीकाही अखिलेश यादव यांनी केली.























































