ट्रेंड – अक्षय खन्नाचा जबरदस्त डान्स

‘धुरंधर’ चित्रपटातील अक्षय खन्नाच्या डान्सची जबरदस्त व्रेझ दिसून येत आहे. चित्रपटात रहेमान डपैत बनलेल्या अक्षय खन्नाने एका बलुची गाण्यावर डान्स केला आहे. गाण्यात तो अगदी थोडाच नाचलाय. खांदे वर करून, हात पाठीपुढे करून… मात्र हा काही सेपंदाचा नाच सिनेप्रेमींना भलताच आवडलाय. अक्षयच्या गाण्यावर लोक भन्नाट मिम्स करत आहेत. तसेच अक्षयसारख्या स्टेप्स करत रिल्स बनवत आहेत. ‘धुरंधर’ मधील अक्षयचा डान्स, त्याचे डायलॉग जबरदस्त व्हायरल होत आहेत. दिल्ली पोलिसांनीही या हटके डान्सची क्लिप वापरून ‘नशा करू नका’ असा  संदेश नागरिकांना दिला आहे.