
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 22 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रात थिएटर सुरू करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच अक्षय कुमार व दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत त्यांच्या सुर्यवंशम चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जाहीर केली. सूर्यवंशम हा बहुप्रतिक्षीत चित्रपट येत्या दिवाळीत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
रोहीत शेट्टीने इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. त्याने यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले आहेत. ‘आदरनीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार,. महाराष्ट्रातील थिएटर 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार. अखेर आता आपण बोलू शकतो की या दिवाळीला पोलीस येत आहेत’ अशी पोस्ट रोहीत शेट्टी यांनी शेअर केली आहे.
अक्षय कुमारने देखील मुख्यमंत्र्याचे आभार मानले आहेत. ‘आज अनेक कुटुंब उद्धव ठाकरे यांचे आभार मानत असतील. महाराष्ट्रातील थिएटर 22 ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी आभारी आहे., आता कुणाच्या थांबवण्याने नाही थांबणार. येत आहे पोलीस’, असे अक्षयने इस्टाग्रामवर शेअर केले आहे.






























































