
सामना ऑनलाईन । मुंबई
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या वादात अक्षय कुमार विनाकारण ओढवला आहे. एका कार्यक्रमात दुसर्याच अभिनेत्रीबद्दल अक्षय कुमारला प्रश्न विचारला गेला होता. परंतु एका युट्युब चॅनलने त्याच्याशी छेडछाड करत या व्हिडीओत तनुश्रीचा नाव टाकले आणि हा प्रश्न तनुश्रीबाबत विचारल्याचे भासवले. ही गोष्ट जेव्हा अक्षय कुमारच्या लक्षात आली तेव्हा त्याने पोलिसांत धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली आहे.
Mumbai: Akshay Kumar on Saturday filed a complaint to cyber police stating that during an event he was asked a question on an actress but the part uploaded on YouTube was edited&actress’ name was replaced with Tanushree Dutta. Complaint also filed with YouTube. Investigation on. pic.twitter.com/z2UIlkBRBC
— ANI (@ANI) October 8, 2018
नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता मधील वाद शमण्याची चिन्हे सध्या दिसत नाही. या प्रकरणात सिनेसृष्टीतल्या दिग्गजांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. परंतु अक्षय कुमारने याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. एका कार्यक्रमादरम्यान एका वार्ताहराने अक्षयला दुसर्याच अभिनेत्रीबाबत प्रश्न विचारला होता. अक्षयने त्याबाबत उत्तरही दिले होते. परंतु एका युट्युब चॅनलने हा व्हिडीओ एडिट करून मूळ अभिनेत्रीच्या ऐवजी तनुश्रीचे नाव टाकले. त्यामुळे हे उत्तर तनुश्रीबाबत असल्याचा या चॅनलने भासवले. जेव्हा अक्षय कुमारच्या निदर्शनास हा व्हिडीओ आला तेव्हा त्याने याबाबत पोलिसांत तक्रार केली.
वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स भागातील सायबर पोलिसांत अक्षयने तक्रार दिली. परंतु जेव्हा पोलिसांनी इंटरनेटवर हा व्हिडीओ शोधला तेव्हा तो सापडला नाही. चॅनलने हा व्हिडीओ डीलीट केला असावा अशी शंका वर्तवली जात आहे. तसेच पोलिसांनी अक्षयकडे या व्हिडिओची मागणी केल्याची माहिती आहे. अक्षय कुमार सध्या नाना पाटेकरसोबत हाऊसफुल चित्रपटात काम करत आहेत.


























































