
सामना ऑनलाईन । मुंबई
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने ट्रॅफिक पोलिसांच्या वेशातील त्याचा एक शानदार फोटो शेअर केला आहे. मात्र त्याचा हा फोटो कोणत्याही चित्रपटातील नसून तो मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या एका चळवळीत सहभागी असल्याचा आहे. अक्षय हा नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन लोकांच्या मदतीसाठी धावून येत असतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्यात योगदान देणारा अक्षय आता ‘रस्ते सुरक्षा’ चळवळीशी जोडला गेला आहे. अक्षयने स्वत:सोशल मीडियावर आपला एक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
Honoured to associate with @MORTHRoadSafety and take forward the ‘Road Safety’ movement. I sincerely hope the campaign will bring about a behavioral change towards traffic & road safety and in turn help save precious lives. pic.twitter.com/WMcj2IDJ9P
— Akshay Kumar (@akshaykumar) June 3, 2018
अक्षयने शेअर केलेल्या फोटोत तो मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तसेच ट्रॅफिक पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या अक्षयच्या एका हातात वायरलेस फोन असून तो एकंदरीत वाहतूक आणि रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांच्या मदतीसाठी तत्पर आणि सतर्क असलेला पाहायला मिळत आहे. अक्षयचा हा शानदार लूक सलमानच्या दबंग स्टाईलवर भारी पडत आहे.
अक्षयने या फोटो सोबतच आपल्या चाहत्यांना याबाबत काही खास माहितीही दिली आहे. ‘मॉर्थ (Ministry of Road Transport & Highways, Government of India) च्या वाहतूक आणि रस्ते सुरक्षिततेच्या चळवळीसाठी माझी निवड करण्यात आली ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मला आशा आहे की, माझ्या या चळवळीमुळे वाहतूक, रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टाने लोकं अधिक सजग होतील तसेच लोकांचा अनमोल जीव वाचण्यासाठी मदत होईल. अक्षय याआधीही मुंबई पोलिसांच्या ‘रस्ते सुरक्षा’ चळवळीचा चेहरा होता. तसेच अक्षयने केवळ मुंबईतच नाही इतर राज्यांच्या सरकारशी संबंधित असलेल्या सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.


























































