
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा उत्साह बाजारात दिसून आला. मुंबईतील दादरसह सर्वच बाजारपेठांमध्ये आज गर्दी उसळली होती. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणेदेखील शुभ समजले जाते. उद्या दिवसभरात मुंबईतील सराफा बाजारात सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.
मंगळवारी मुंबईत जीएसटीसह सोन्याचा दर 97,500 रुपये प्रतितोळा होता. अक्षय्य तृतीयेला भाव वाढतील म्हणून अनेकांनी आदल्या दिवशी सोन्याच्या दागिन्यांचे बुकिंग केले. उद्या मुंबईतील सराफा बाजारात 80 टन सोन्याच्या विक्रीतून सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. – z कुमार जैन, इंडियन बुलियन ज्वेलर्स असोशिएशन