भयंकर! 5 डॉक्टरांचे अपहरण करून ठार मारले, अल-शबाब दहशतवादी संघटनेचे क्रूर कृत्य

1290

अल-शबाब नावाच्या दहशतवादी संघटनेनं 9 डॉक्टरांचे अपहरण करून त्यांना ठार मारले आहे. गुरुवारी हा प्रकार घडला असून या सर्व डॉक्टरांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले होते. ज्या दहशतवादी संघटनेनं हे क्रूर कृत्य केलं आहे ती अल-कायदाशी संलग्न संघटना असल्याचे सांगण्यात आले आहे.

सोमालियातील दक्षिण भागामध्ये हा प्रकार घडल्याचे वृत्त कळाले आहे. हिरान या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटलंय की शाहबेल भागातील बालाद शहराजवळ या डॉक्टरांचे मृतदेह आढळून आले आहेत. अन्य एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटलंय की हे सगळे डॉक्टर तरुण होते आणि स्थानिक रुग्णालयांमध्ये काम करत होते.

सोमियालियामध्ये यादवी माजलेली आहे. 1990 पासून तिथे असंतोष धुमसत असून हा देश दहशतवादी कारवायांनी पोखरला गेला आहे. अल-शबाब या दहशतवादी संघटनेनं परिस्थिती आणखी गंभीर केली आहे. या दहशतवाद्यांना सोमालियामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे. त्यासाठी ही संघटना सोमालियातील विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ले करत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या