जॅक मा ट्विटरवर,काही तासांतच 61 हजार फॉलोअर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन रिटेल कंपनी अलिबाबाचे संस्थापक तसेच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जॅक मा ट्विटरवर आले आहेत. सोमवारी त्यांनी कोरोनाविषयीची पहिली पोस्ट शेअर केली. यात अमेरिकेसाठी कोरोना टेस्ट किट आणि मास्क शांघाय शहरातून इस्टर्न एअरलाईन्सने पाठविण्यात येत असल्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. फोटो पोस्ट करताना त्यांनी अमेरिकेला ऑल द बेस्ट म्हटले असून अवघ्या काही तासांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 61 हजारांवर गेली आहे.
ट्विटरवरील जॅक मा यांची पहिलीच पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली. पहिल्या सात तासांतच त्यांच्या ट्विटला 23 हजार 400 लोकांनी रिट्विट केले. तसेच 1 लाख 26 हजार यूजर्सनी ही पोस्ट लाइक केली आहे.