सहाय्यक पोलीस निरीक्षकाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

1375

अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने यांनी रविवारी आपल्या महाड येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिल्हा पोलिस दलातील पोलिसांच्या आत्महत्येबाबतची ही गेल्यावर्षातील चौथी घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रायगड पोलीस दल चर्चेत आले आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने हे गेली पंधरा वीस वर्षे पोलीस खात्यात काम करीत होते. सध्या त्याची नेमणूक अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर होती. 29 जानेवारी पासून ते 13 फेब्रुवारी पर्यत ते रजेवर होते. महाड तालुक्यातील शिरगाव हे माने याचे गाव. सुट्टी घेऊन ते आपल्या गावी आले होते. रविवारी दुपारी त्यांनी आपल्या राहत्या घरी घराच्या छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर महाड पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. या आत्महत्येबाबत कारण स्पष्ट झाले नसून याबाबत महाड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या