रायगड जिल्हा पोलीस कबड्डी संघ प्रथम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। अलिबाग

पेझारी येथे भैरवनाथ स्पोर्ट क्लब तर्फे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय खुल्या व्यावसायिक कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रायगड जिल्हा पोलीस संघ विरुद्ध जेएसडब्लू संघ या चुरशीच्या सामन्यात जिल्हा पोलिसांनी जेएसडब्लूवर 7 गुणांनी मात करून प्रथम क्रमांक पटकावला. पोलीस संघाच्या विजयाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी अभिनंदन केले आहे.

23 जानेवारी 2019 रोजी मौजे पेझारी येथे भैरवनाथ स्पोर्ट क्लब पेझारी यांच्या वतीने जिल्हास्तरीय खुल्या व्यवसाईक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कबड्डी स्पर्धेत 12 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात रायगड जिल्हा पोलीस विरुद्ध जे.एस.डब्ल्यू. डोलवी या संघामध्ये लढत होऊन अटीतटीच्या सामन्यामध्ये चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात जे.एस.डब्ल्यू डोलवी या टीमवर मात करून रायगड जिल्हा पोलीस कबड्डी संघाने 7 गुन्नानी विजय मिळवुन प्रथम क्रमांक पटकाविला.

सदर स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून रायगड पोलीस दलातील बिपीन जगदीश थळे यांना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. रायगड जिल्हा पोलीस संघामध्ये सागर चीलारे (संघ नायक), पोना अमोल नलावडे, चेतन म्हात्रे, संकेत पाटील, प्रणीत पाटील, पोशी चेतन वेळे, मोरेश्वर ओमले, उद्धव पाटील, समीर धूरी, प्रशांत घरत हे सहभागी झाले होते. तसेच पोह संजय मोकल (प्रशिक्षक), व पोह किशोर गजानन गुरव (संघ व्यवस्थापक) म्हणून काम पहिले. रायगड जिल्हा पोलीस कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविल्या बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर व अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी संघ व्यवस्थापक व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.