उन्नाव बलात्कार प्रकरण, सगळे खटले दिल्लीतील जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची सुनावणी उत्तर प्रदेशाबाहेर चालवण्यात यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. या प्रकरणासंदर्भात जे खटले दाखल झाले आहेत ते सगळे उत्तर प्रदेशाबाहेर चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

ही सगळी प्रकरणे आता दिल्लीमध्ये वर्ग करण्यात येणार असून जलदगती न्यायालय या प्रकरणांची सुनावणी करेल.

उन्नाव बलात्कार पीडित महिलेचे पत्र का पोहचले नाही? सरन्यायाधीश रंजन गोगाईंचा उद्विग्न सवाल