
सलग सुट्टय़ांमुळे पुणे, मुंबईतील नागरिक मोठय़ा प्रमाणावर कुटुंबासोबत देवदर्शन आणि पर्यटनासाठी बाहेर पडल्यामुळे पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, मुंबई-कोल्हापूर महामार्गांवर वाहतूककोंडी झाली आहे. पुणे-मुंबई एक्प्रेस वेवर 12 कि.मी.च्या रांगा लागल्या. मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती.
दुसरा शनिवार, रविवार, मंगळवारी स्वातंत्र्यदिन आणि बुधवारी पारसी नूतन वर्ष प्रारंभ दिन आहे. सोमवारी रजा घेतली की, सलग पाच दिवस सुट्टय़ा! ही संधी साधून मोठय़ा प्रमाणावर चाकरमानी कुटुंबासमवेत घराबाहेर पडले आहेत. अनेकांनी स्वतःची वाहने बाहेर काढल्याने सर्वच महामार्गांवर शनिवारी ट्रफिक जाम झाले. पुणे-सोलापूर, पुणे-छत्रपती संभाजीनगर, मुंबई-कोल्हापूर, पुणे-नाशिक या महामार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुणे-मुंबई एक्प्रेस वेवर नेहमीच वाहतूककोंडी पाहायला मिळते. सलग सुट्टय़ांमुळे मुंबईकर देवदर्शन, पर्यटन आणि गावी जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडले. त्यामुळे खंडाळा घाटात सकाळपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 12 कि.मी. लांब रांगा लागल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. एसटी महामंडळाने स्वारगेट आणि शिवाजीनगर या दोन्ही आगारांतून 40 ते 50 जादा एसटी गाडय़ा सोडल्या तरीही गर्दी होतीच. सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड, धाराशीव व केकणातील सर्व भागांत जाणाऱया एसटी बसेस भरून जात आहेत. तसेच सलग सुट्टय़ांचा परिणाम रेल्वेवरदेखील झाला आहे.
खासगी ट्रव्हल्सची ‘दिवाळी’
रेल्के, एसटीचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने नागरिकांनी आपला मोर्चा खासगी ट्रव्हल्सकडे वळवला आहे. त्याचा फायदा घेऊन खासगी ट्रव्हल्स वाहतूकदारांनी तिकीट दरात वाढ केल्याने नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. कोकण, मराठवाडय़ात जाणाऱया प्रवाशांकडून जास्तीचे तिकीट आकारत आहेत.































































