
गुजरातमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप सरकारच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्वांचे राजीनामे स्वीकारले असून तातडीने मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.
नियमानुसार 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 27 मंत्री असू शकतात. गुजरात सरकारमध्ये 16 कॅबिनेट आणि 9 राज्यमंत्री असे एकूण 25 मंत्री आहेत. आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावाखाली या सर्वांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील एक-दोन अपवाद वगळता सर्वांना डच्चू दिला जाणार आहे. त्यांच्या जागी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे.