कोपरगावात सर्व पक्षीयांची जोरदार निदर्शने: पाकिस्तानचा झेंडा जाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

पुलवामामधील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 42 जवान शहीद झाले आहेत. या दहशतवादी हल्लाचा निषेध करताना बदला घ्या ….बदला घ्या, अशा जोरदार घोषणा देत शिवसेनेने शुक्रवारी जोडे मारा आंदोलन केले. संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला व पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

कश्मिरात काल गुरुवारी झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरात निषेध होत असून, आज कोपरगाव शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख सनी वाघ यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख सनी वाघ, गटनेते योगेश बागुल, वि. स. संघटक असलम शेख, भरत मोरे, बाळासाहेब जाधव, महिला आघाडीच्या सपना मोरे यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ, कोपरगाव मुस्लीम समाजाच्या वतीने आंबेडकर मैदान तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ हिंदुराष्ट्र समितीच्या वतीने निषेधाचे फलक हातात घेवून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत या दहशतवादी हल्याचा निषेध केला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदीप वर्पे, शहर प्रमुख सुनील गंगुले, मुस्लीम विकासचे नगरसेवक हाजी मेहमूद सैय्यद, मोहसीन सैय्यद आदी तर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवाजी रघुनाथ वाघ, वनिता आव्हाड, निर्मला सारंगधर, कृष्णा जाधव, सागर लाड, रोहन दरपेल, प्रीतम काटकर, अनिकेत हलवाई आदी उपस्थित होते.