फ्लॉवर नही फायर ! 6 मिनीटांच्या सीनसाठी 60 कोटी उडवले

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ सिनेमाने जबरदस्त धुमाकूळ घातला होता. आता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रूल’ चा टीझर नुकताच समोर आला आहे. 60 सेकंदाच्या या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एकाच गेटअपमध्ये दिसत आहे. या टिझरमध्ये अल्लू अर्जुन यांचा गेटअप असाच नाहीय तर तो एका धार्मिक उत्सवाशी जोडलेला आहे. ज्याला ‘रुपति गंगम्मा जतारा’ असे बोलले जाते. या उत्सवामागे महिलांच्या सन्मानाबाबतची जुनी कहाणी आहे. तर या सिनेमातील एका सिक्वेन्ससाठी सिनेनिर्मात्याने तब्बल 60 कोटी रक्कम खर्च केली आहे.

लोककथा आणि मिथकांनुसार तातैयागुंटा गंगम्मा ला तिरूपती शहराची ग्रामदेवी मानले जाते. अनेक कथांमध्ये तिला भगवान वेंकटेश्वर स्वामी यांची बहिणही बोलले गेले आहे.बोललं जातं की शंभर वर्षांपूर्वी तिरूपती आणि आसपासच्या क्षेत्रातील पलेगोंडुले यांचे राज्य होते . ‘पुष्पा 2’ च्या टीझरमध्ये अल्लू अर्जुन संपूर्ण शरीरावर निळा रंग आहे. त्याने विग घातला आहे, साडी नेसली आहे आणि गळ्यात लिंबाची माळ, हारतुरे, कानात मोठे झुमके असा पारंपारिक मेकअप स्त्रिया करतात अशा वेशात दिसत आहे.

न्यूज 18च्या वृत्तानुसार, पुष्पा 2 या सिनेमातील ‘गंगम्मा जतारा’ हा सीक्वेन्स खूप महत्वाचा आहे. यासाठी मेकर्स यांनी मोठी रक्कम खर्च केली आहे. या सिनसाठी अनेक हिट सिनेमांचेही बजेट नसेल. सिनेमातील हा सीक्वेन्स केवळ 6 मिनिटांचा आहे आणि त्याच्या शूटिंगसाठी 30 दिवस लागले आहेत. ‘पुष्पा 2’च्या या एका सीक्वेन्सवर सुमारे 60 कोटी रुपये खर्च झाले आहेत. तर हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या बातमीला ना दुजोरा दिला ना नाकारली,. मात्र त्याने सांगितले की, मी फक्त एवढे सांगू शकता की, हा एक बिग बजेटचा सेट आहे, आणि हा पूर्ण माहोल तयार करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे. सूत्राने हेही सांगितले की, हा सीक्वेन्स शूट करताना अल्लू अर्जुनला पाठदुखीही झाली होती, मात्र त्याने ते सर्व सीन शूट केले. टीझरमधील या दृश्याने प्रेक्षकांना सिनेमा पाहण्यासाठी तयार केले आहे, ते मोठ्या पडद्यावर पाहणे हा एक विलक्षण अनुभव असणार आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमा 15 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक सुकुमारच्या या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल देखील दिसणार आहेत.