अमरनाथ मधील शिवलिंग वितळले, भाविक निराश

सामना ऑनलाईन । श्रीनगर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ मधील गुहेतील बाबा बर्फानी अदृश्य झाले आहेत. जगप्रसिद्ध अमरनाथ यात्रा जवळपास दोन महिने सुरू असते, मात्र यंदा अमरनाथला जाणाऱ्या शिवभक्तांचा हिरमोड झाला आहे. कारण अमरनाथच्या गुहेतील बर्फाचे शिवलिंग एक महिना अगोदरच वितळून नाहीसं झाले आहे. २८ जूनला सुरू झालेली अमरनाथ यात्रा २६ ऑगस्टला संपणार आहे, मात्र शिवलिंग वितळल्यामुळे भाविक निराश झाले आहेत. आत्तापर्यंत २ लाख ३० हजार भाविकांनी अमरनाथ बाबंचं दर्शन घेतलं आहे.

दरम्यान शिवलिंग वितळल्याबाबत राष्ट्रिय हरित लवादाने देखील चिंता व्यक्त केली आहे. मागील १० वर्षांपासून शिवलिंगाचा आकार सतत कमी होत असल्याचे दिसून आहे आहे. त्यामुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.