अमरनाथ यात्रा पुन्हा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढगफुटीमुळे गेले चार दिवस स्थगित करण्यात आलेली अमरनाथ यात्रा बालटाल मार्गे पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 8 जुलै रोजी पवित्र गुहेजवळ झालेल्या ढगफुटीमुळे 16 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चार दिवस यात्रा स्थगित करण्यात आली होती. त्या आधीही खराब वातावरणाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा थांबवली होती. बालटाल बेस पॅम्पमधून भाविकांचा नवा ग्रुप मंगळवारी सकाळी बाबा बर्फानीच्या गुहेच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.